Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायतसाठी महत्वाची बातमी : ‘तो’ विकासनिधी मिळण्याबाबत मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई :

Advertisement

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याकरीता 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत निधीचा चौथा हप्ता दोन महिन्यात देण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Advertisement

सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत बंधित व अबंधित अशा दोन स्वरुपात निधी प्राप्त झाला आहे.

Advertisement

सन 2020-21 या पहिल्या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे त्यांचे नियोजन समन्वय व नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

बंधित स्वरुपात प्राप्त एकूण निधीच्या प्रत्येकी 50 टक्के निधीचा वापर स्वच्छता आणि पिण्याचे पाणी या बाबींसाठी करायचा आहे. हा निधी लोकसंख्येप्रमाणे देण्यात येणार असून गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या छोट्या छोट्या कामांसाठी वापरता येणार आहे.

Advertisement

हा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राहूल कुल यांनी भाग घेतला.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply