Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चौघा सभापतींच्या अनुपस्थितीने मतभेद उघड; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता आहे. मात्र, सध्या निधीची पळवापळवी आणि इतर मुद्द्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यालाच स्थायी समितीला सभापतींच्या अनुपस्थितीच्या मुद्द्याची जोड मिळाल्याने जोड मिळाल्याने चर्चेला उधाण आलेले आहे.

Advertisement

अध्यक्ष राजश्री घुले यांनी याप्रकरणी म्हटले आहे की, निधी वाटपावरून काहीही मतभेद नाहीत. आम्ही फाईल अजिबात पेंडिंग न ठेवत विकास कामांचा निधी सर्वांना बरोबर घेऊनच वितरीत केला जातो. राज्य सरकार कडून मिळणारा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आहे. त्यामुळे सर्वांना निधी वाटप होत आहे.

Advertisement

दरम्यान, विकास कामांच्या निधीचे अनियमित वाटप आणि फाईलींच्या पेंडन्सीबाबत काही सभापती मंडळींनी मुख्य कार्यकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेतली आहे. मात्र, कोणत्याही सभापतींनी अजूनही यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने यावेळी कोण कोण उपस्थित होते, हे स्पष्ट झालेले नाही. स्थायी समितीची सभा अध्यक्ष घुले यांनी एकट्याने घेतली. अगोदर ही सभा तहकूब करण्यात येऊन त्यानंतर पुन्हा सभा घेण्यात आली.

Advertisement

स्थायी समितीच्या सभेला सभापती काशिनाथ दाते, सुनील गडाख, उमेश परहर, सभापती मीरा शेटे, सदस्य संदेश कार्ले, अजय फटांगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात उपस्थित असतानाही सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे मतभेदाच्या चर्चेला आणखी उधाण आलेले आहे.

Advertisement

निधीची पळवापळवी, मंजूर कामे कधी सुरू होणार, मार्चअखेर मंजूर पैसे खर्च होणार की नाही यावरून नाराज असलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी यानिमित्ताने थेट नाराजी जाहीर केली आहे. आता ते याप्रकरणी जगजाहीर कोणती भूमिका घेतात की, त्यांचे हे वादळ ‘पेल्या’तील ठरते याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply