Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भेसळयुक्त दुधाच्या ‘त्या’ केंद्रांवर छापा; परंतु, ‘तो’ मिल्कमॅन गुलदस्त्यातच..!

अहमदनगर :

Advertisement

अनेकदा दुधाचे संकलन करून विकणाऱ्यांच्या केंद्रावर छापा टाकल्याच्या बातम्या येतात, मात्र असे दुध खरेदी करणाऱ्या कंपन्या कोणत्या हेच पुढे येत नाही. आताही राहुरी तालुक्यातील दोन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. मात्र, हे दुध कोणाला पुरवठा केले जात होते, हेच जाहीर झालेले नाही.

Advertisement

राहुरी तालुक्यातील कोंढवड, शिलेगाव परिसरातील करपारवाडी येथील दोन दूध संकलन केंद्रांवर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापे टाकले. त्यात शीतकरण केंद्रास या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कुटे, शरद पवार, नमुना सहायक प्रसाद कसबेकर आदींनी ही कारवाई केली.

Advertisement

७५५ लिटर दूध व पावडर असा एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा माल जप्त करण्यात आले. भेसळयुक्त दूध जागेवर नष्ट करण्यात आले. पहिल्या दूध संकलन केंद्रावर १०० लिटर दूध व पावडरीचे ४० लिटर द्रावण, तसेच पावडर व दूध एकत्र केलेले भेसळीचे ३०० लिटर द्रावण असा एकूण २४ हजार ९३१ रुपयांचा साठा, तर दुसऱ्या दूध संकलन केंद्रावर १५ किलो पावडर व ३०० लिटर भेसळयुक्त दूध असा ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply