धुळे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद यात्रा या अभियानातून संवाद कमी आणि विसंवाद जास्त दिसायला आता सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेचा घटक पक्ष असलेल्या या पक्षापुढे त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. धुळे येथे कार्याकार्यांमध्ये राडा झाल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणत काढता पाय घ्यावा लागला.
मंगळवारी सायंकाळी शहरात कार्यकर्ता संवाद मेळावा सुरू असताना माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांचे कार्यकर्ते आपसात भिडले, एकमेकांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून जयंत पाटील हतबल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडले व शांतता ठेवण्याचे आवाहन केले.
वाद सुरू असतानाच मंत्री पाटील बोलत होते. या वेेळी ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इतरांनी दुसऱ्याचे मत सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. तर, राष्ट्रवादी भवनातही कार्यक्रम झाला. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सत्कार व फाेटाे सेशनवेळी बेशिस्तीचे दर्शन घडवले.
एकूणच पाटील यांचा धुळे दौरा पक्षाच्या विसंवादावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. आता हा वाद मिटणार की आणखी फोफावणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- IND vs ENG: रोहीतला दिलासा..! T20 मालिकेत विराटची जागा घेणार ‘हा’ स्फोटक फलंदाज
- Eknath Shinde: दाऊद प्रकरणात एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप; म्हणाले,राष्ट्रवादीमुळे..
- Relationship tips: मुलींना आवडते मुलांच्या ‘या’ सवयी! जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल सर्व काही
- Man’s health: पुरुषांनी लोणचे जास्त का खाऊ नये?; धोका वाढण्यापूर्वी जाणून घ्या सत्य
- Maruti: अर्र.. अनेकांना धक्का देत मारुतीने घेतला मोठा निर्णय; सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार केली बंद