Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इंडोनेशियात वाहिली ‘खून की नदियां’; जगभरात पसरली भीती..!

सध्याच्या सोशल मिडीयामध्ये कोणत्याही फोटो, बातमी किंवा व्हिडिओच्या मदतीने अफवा किंवा भीती पसरवणे खूप सोपे झालेले आहे. ठिकाण किंवा संदर्भ बदलून किंवा प्रसंगी त्यात एडीट करून असे दुष्कृत्य केले जाते. आताही इंडोनेशिया देशातील फोटो व व्हिडिओ दाखवून व संदर्भ बदलून तिथे ‘खून की नदियां’ वाहत असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

इंडोनेशिया देशातील पेकलोंगन या छोट्याश्या शहरातील हा प्रकार आहे. ट्विटर आणि फेसबुक यासह अनेक ठिकाणी लाल रंगाचे पाणी रस्त्यावरून वाहतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेले आहेत. त्यात ‘इसे दुनिया का अंत न बता दिया जाए या खून की बारिश’ असे दावे करून जगाला भीती दाखवण्याचे प्रयत्न होत आहेत. काहींनी हे जाणीवपूर्वक केले आहे, तर काहींनी अज्ञानाने काळजीपोटी. मात्र, यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

(255) Indonesian village turns bloody after ‘end of the world’ rain ? – TV9 – YouTube

Advertisement

या शहरात कपड्यांना रंग देण्याचे व्यवसाय आहेत. अनेकदा येथील रंग बाहेर ठेवलेले असतानाच पाउस आल्यास असे प्रकार घडलेले आहे. यापूर्वी इथे हिरव्या, निळ्या व करड्या रंगाच्या नद्या वाहिलेल्या आहेत. आताही लाल रंगाचे पाणी येथील रस्त्यावरून वाहताना लॉक त्यातून प्रवास करताना दिसत आहेत. एकूणच लाल रंगाचे पाणी पाहून अनेकांना हा पर्यावरणाचा असमतोल झाल्याने अशी घटना घडल्याचे वाटले आहे. तर, काहींनी याला नको तेही जोडून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply