Take a fresh look at your lifestyle.

‘रिलॅक्स बसा, हे काँग्रेस ऑफिस आहे BJP चे नाही..’; राहुल गांधींनी हाणला दमदार टोला

दिल्ली :

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणजे एक वेगळे आणि मार्मिक टोला हाणणारे व्यक्तिमत्व असल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच भाजपला दमदार टोला हाणून आपणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

Advertisement

राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद होती. त्यात त्यांनी सुरुवातीलाच भाजप आणि काँग्रेस यांच्यातील फरक खूप मार्मिक पद्धतीने समजावून सांगण्याचे काम केले आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेत सगळे कसे आखीव-रेखीव असते. तिथे पत्रकारही दबलेल्या पद्धतीने बसलेले असतात, अशी दिल्लीत चर्चा असते.

Advertisement

व्हिडिओ पाहायासाठी पुढील युट्युब लिंकवर क्लिक करा :

Advertisement

तोच धागा पकडून आज राहुल गांधी यांनी खुर्चीवर बसतानाच इंग्रजीत म्हटले की, अरे पत्रकार बांधवांनो, असे धरून आणल्यासारखे काय बसलाय.. अरे निवांत बसा.. हे काही भाजपचे ऑफिस नाही.. आणि त्यांची पत्रकार परिषद नाही.. त्यामुळे काँग्रेस कार्यालयात निवांत बसा..

Advertisement

एकूणच भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्याकडून पत्रकरांना व माध्यम संस्थांना दिल्या जात असलेल्या वागणुकीची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू असते. त्याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी भाजपला हा टोला हाणला आहे. आता त्याला भाजप कसे प्रत्युत्तर देते की दुर्लक्ष करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply