सध्या देश दोन बाजूने विभागाला गेला आहे. एक आहेत शेतकरी आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी या विचारांचा, तर दुसरा गट आहे शेतकरी आंदोलन हे दहशतवाद्यांचे असल्याचे सांगणारा. काहींना मात्र, कोणती बाजू खरी आणि कोणती खोटी हेच समजेनासे झालेले आहे. अशावेळी दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा रतीब घातला जात आहे.
गुरुवारी 28 जानेवारी रोजीही अशाच अनेक उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यातील एक महत्वाची बातमी होती की, सिंधू बॉर्डर हा दिल्लीच्या जवळील भाग शेतकरी आंदोलकांनी सोडून जावा या मागणीसाठी स्थानिक गावकरी आंदोलन करीत आहेत. रस्ता मोकळा करण्याची मागणी असल्याचे अनेकांनी बातमीत म्हटले होते.
मात्र, ते आंदोलन गावकऱ्यांचे नसून एका हिंदुत्ववादी संघटनेचे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ALT NEWS यांनी यावर स्पेशल फिचर प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, आज तक वृत्तवाहिनीने ट्विट केले आहे. त्यात हे आंदोलन स्थानिक हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. विष्णू गुप्ता (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू सेना) यांनी या आंदोलनाची प्रेसनोट प्रसिद्ध केलेली आहे.
एकूणच शेतकऱ्यांना विरोध स्थानिकांचा किंवा शेतकऱ्यांचा नाही तर, हिंदुत्ववादी संघटनेचा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. वेगवान बातम्या देण्याच्या नादात अनेकदा माध्यम समूहांकडून अशा चुका होतात. त्याचाच हा प्रकार आहे की, कोणी माध्यम समूहाने जाणीवपूर्वक अशी बातमी दिली हे स्पष्ट होऊ शकत नाही. मात्र, जर चुकीची बातमी प्रसिद्ध केली तर जाहीर माफी मागण्याची नैतिकता भारतीय माध्यमांमध्ये नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.
अगदी एएनआय वृत्तसेवा, एनडीटीव्ही, द हिंदू, टाईम्स नाऊ, हिंदुस्तान टाईम्स, सीएनएन न्यूज टुडे, इंडिया टुडे, टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान, द इंडियन एक्स्प्रेस, टीव्ही 9 तेलगु यांनीही गावकऱ्यांचा शेतकऱ्यांना विरोध असल्याची बातमी प्रसिद्ध केलेली आहे. एकूणच यामुळे शेतकरी आंदोलनाची पुन्हा एकदा बदनामी झाल्याचे दिसते. कारण, हिंदू सेना यांनी आंदोलक खलिस्तानी असल्याचे म्हटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- T20 World Cup: मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ खेळाडू T20 विश्वचषकात खेळणार, बुमराहला मिळणार नवीन पार्टनर
- Relationship Tips : पत्नी नवऱ्यावर का संशय घेते? ‘ही’ आहेत 4 मोठी कारणे; जाणुन घ्या डिटेल्स
- Man’s problem: ‘ही’ हिरवी भाजी पुरुषांच्या या ‘कमकुवतपणा’करणार दूर; अंतर्गत समस्यांपासून मिळणार सुटका
- Lalu Yadav: लालू यादव आयसीयूमध्ये दाखल, बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Yoga Trainer Murder: 23 वर्षीय इंटरनेट सेलिब्रिटी आणि योगा ट्रेनरची हत्या, अनेक चर्चांना उधाण