Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ सरकारची डोळेझाक का; ‘सुप्रीम’ने प्रक्षोभक वाहिन्यांवर कार्यवाहीची केली टिपण्णी

दिल्ली :

Advertisement

शेतकरी आंदोलनाच्या हिंसक घटनांच्या वेळी किंवा अगदी कधीही जसे सरकार इंटरनेट बंद करते. तशाच पद्धतीची नाही, मात्र सौम्य कार्यवाही प्रक्षोभक बातम्या आणि कार्यक्रम चालू असताना केंद्र सरकार का करीत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

तबलिगी जमातशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ही महत्वाची टिप्पणी केली आहे. केंद्राचे वकील तुषार मेहता हे सरकारची बाजू मांडत असताना सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे की, दिल्लीत २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या गोंधळावेळी सरकारने काही भागातील इंटरनेट बंद केले जाते. मग इंटरनेट बंद करण्यासारखी प्रतिबंधात्मक कार्यवाही प्रक्षोभक माहिती रोखाण्यासारखी वृत्तवाहिन्यांवर सरकार का करू शकत नाही?

Advertisement

करोना विषाणूचे संकट देशात आले त्यावेळी दिल्लीत तबलिगी जमात यांच्याशी निगडीत मोठा कार्यक्रम झाला होता. असा मोठा धार्मिक कार्यक्रम केल्याने आणि त्याद्वारे परदेशातील नागरिक देशभरात आल्याने करोना विषाणू फैलावला अशा आशयाच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या होत्या. तसेच याप्रकरणी धार्मिक वाद वाढतील असे कार्यक्रम अनेक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते.

Advertisement

सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, ‘काही वाहिन्यांवर सतत प्रक्षोभक मजकूर प्रसारित होत असतो. मात्र सरकार म्हणून तुम्ही काहीच करत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही इतर प्रतिबंधात्मक (इंटरनेट बंद करण्यासारखे) उपाय करता तसेच वाहिन्यांवरही नियंत्रण आवश्यक आहे. तुम्ही याकडे डोळेझाक का करत आहात हे मला माहीत नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ आक्रमक कारवाई नाही. मात्र तुम्ही तर अशा प्रकरणात काहीच करत नाही.’

Advertisement

 स्पष्ट व खऱ्या बातम्यांमुळे सामान्यपणे कुणालाही काहीच त्रास नाही. मात्र एखाद्या विशेष समुदायाने संतप्त व्हावे आणि त्यातून दुसऱ्या समुदायावर हल्ला करावा, अशा बातम्या दिल्या जातात तेव्हा समस्येला सुरुवात होते. अशा प्रकारची माहिती (चिथावणीखोर) रोखणे, नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे, अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply