Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेणु शर्मा प्रकरणावरून तृप्ती देसाई अजूनही आक्रमक; केला ‘तो’ सवाल

पुणे :

Advertisement

राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे रेणु शर्मा प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बरेच गाजले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरन ढवळून निघाले. दरम्यान मुंडेच्या विरोधात आक्रमक पद्धतीने सामोर्‍या जाणार्‍या रेणु शर्मा यांनी अचानक तक्रार मागे घेतल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मुंडेवर निशाणा साधला.

Advertisement

रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात, असे म्हणत त्यांनी मुंडेवर टीकेची झोड उठवली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, रेणू शर्मा आणि तिच्या वकिलांवर धनंजय मुंडे यांनी दबाव तंत्र वापरून तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडले.

Advertisement

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने मोठ्या हिम्मतीनं अत्याचाराच्या संधर्भात तक्रार दाखल केली होती, परंतू पोलीसांनी सुरूवातीला तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं. आणि रेणू शर्मा नावाची महिलाच कशा पध्दतीनं चुकीची आहे, तिला बदनाम करण्यास सुरूवात झाली. ती कशी चारित्र्यहीन आहे, ब्लॅकमेलर आहे, अशा पध्दतीनं संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला, असेही पुढे देसाई यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply