Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फेब्रुवारी महिन्यात ‘या’ भागात होणार पाऊस; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

पुणे :

Advertisement

सध्या थंडीचा तडाखा राज्यभरात जाणवत आहे. अधून मधून दिवसा गरमीसुद्धा जाणवत आहे. आता अशातच पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यात फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

हवामान विभागाचे अधिकारी के.एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यातले आज किमान तापमानात किंचीत वाढ अपेक्षित आहे. येत्या 2 दिवसात आणि नंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता आहे. २५ ते २७ जानेवारी दरम्यान मुंबई ठाणे भागात पण हिवाळा जाणवण्याची शक्यता आहे.

Advertisement

या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply