Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पहा कोण आहे जनतेच्या मनातील ‘नेक्स्ट पीएम’; सर्व्हेमध्ये राहुल गांधींना ‘हे’ स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये देशाचे पंतप्रधानपद भूषवणार किंवा नाही याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. अशावेळी 2024 ला कोण पंतप्रधान पाहिजे याचे सर्वेक्षण सुरूही झालेले आहेत. त्यात भारतीयांनी आपली पसंतीची मोहोर चक्क थेट उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली आहे.

Advertisement

इंडिया टुडे आणि कर्वी इनसाइट्सने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ च्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, जर आता निवडणुका घेतल्या तर पुन्हा भाजप बहुमताने सत्तेत येईल. आता सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, परंतु नरेंद्र मोदींच्या नंतर योगी आदित्यनाथ यांना पुढचे पंतप्रधान म्हणून पहायचे आहे.

Advertisement

दि. 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात 12,232 भारतीयांनी सहभाग घेतला आहे. त्यात ग्रामीण भागातील 67 टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या 33 टक्के लोकांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

अजूनही बहुतेक लोक पंतप्रधान मोदी हेच देशाचे पुढचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतात. तर, योगी आदित्यनाथ दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मोदीच पंतप्रधान व्हावेत असे 38 टक्के लोकांना वाटते. त्याच बरोबर 10 टक्के लोकांना मोदी नंतर योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान म्हणून पहायचे आहे, तर 8 टक्के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुढचे पंतप्रधान म्हणून पहायचे आहे. योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

7 टक्के लोकांना राहुल गांधी यांना पुढचे पंतप्रधान म्हणून पहायचे आहे. तर, त्याचबरोबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 5 % जनतेची पसंती आहे. पंतप्रधानांच्या खुर्चीवर सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना प्रत्येकी 4 टक्के, प्रियंका गांधी व राजनाथ सिंह यांनाही 3 टक्के लोकांनी पंतप्रधान व्हावे असे वाटते. तर, मायावती, अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि नितीन गडकरी हे पुढचे पंतप्रधान व्हावेत असेही प्रत्येकी सरासरी 2 टक्के जनतेला वाटत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
Advertisement

Leave a Reply