Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Paytm आणि Google Pay ला ‘ही’ कंपनी देणार टक्कर; पेमेंट ट्रान्सफरसाठी अजून एक पर्याय आलाय समोर, वाचा फीचर्स

मुंबई :

Advertisement

डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. पेटीएम आणि गुगल पे यांच्या स्पर्धेत आता अजून एक मोठा बिगशॉट प्लेयर उतरला आहे. ऑटो क्षेत्रात तसेच फायनान्स क्षेत्रात नावाजलेल्या बजाज या कंपनीने आता Paytm आणि Google Pay ला टक्कर देणारा पर्याय आणला आहे. बजाज पे सुरू करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. बजाज फायनान्सने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्च 2021 पर्यंत ते डिजिटल पेमेंट अ‍ॅप बजाज पे बाजारात आणतील.

Advertisement

या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला यूपीआय, पीपीआय, ईएमआय कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंटची सुविधा मिळेल. कंपनीने म्हटले आहे की वापरकर्त्यांव्यतिरिक्त, बजाजसाठी व्यावसायिकांसाठी अॅपही विकसित करेल.

Advertisement

याशिवाय बजाज फायनान्स आपल्या ग्रुप कंपन्यांसाठी प्रोप्राइटरी  मार्केटप्लेस ईएमआई स्टोर, इंश्योरेंस मार्केटप्लेस, इंवेस्टमेंट मार्केटप्लेस, बीएफ हेल्थ आणि ब्रोकिंग ऐप आणणार आहे. कंपनीने ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा आणि उत्पादने प्रदान करण्यासाठी 25 अन्य अ‍ॅप इकोसिस्टम सह भागीदारी करण्याबद्दल चर्चा केली आहे. याद्वारे ग्राहकही कंपनीच्या मूळ व्यवसायाशी जोडले जातील.

Advertisement

डिजिटल पेमेंट अ‍ॅप व्यतिरिक्त, बजाज फायनान्स आपला व्यवसाय बदलण्यासाठी अजून 4 प्रॉडक्टिविटी अॅप्स विकसित करीत आहे. सेल्स वन अॅप, मर्चंट अ‍ॅप, कलेक्शन्स अ‍ॅप आणि पार्टनर अ‍ॅपच्या माध्यमातून कर्मचार्‍यांच्या कामाची कार्यक्षमता वाढविण्यात येईल, असा कंपनीचा दावा आहे.

Loading...
Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |

Advertisement

मो. 9503219649 |

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply