Latest news on Maharashtra politics: पुणे (Pune): ‘अन्य पक्षांचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (Bhartiya Janata Party) येण्यास उत्सुक आहेत,’ असा दावा केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंह (Central state minister Renuka Sinha) यांनी केला. ‘केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांशी समन्वय साधून त्यांच्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. तसेच युती झाल्यास मित्रपक्षाला सहकार्य केले जाईल, असे सिंह यांनी सांगत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना दिलासा दिला.
केंद्र सरकारच्या (central government) योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी भाजपचे खासदार नसलेल्या लोकसभा मतदारसंघात नऊ केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. त्याअंतर्गत सिंह यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha constituency) तीन दिवसांचा दौरा नुकताच केला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी, आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) , भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे (District President Ganesh Bhegde) , ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर (OBC State president Yogesh Tilekar) , शरद बुट्टे-पाटील, अतुल देशमुख आणि सुनिल कर्जतकर उपस्थित होते. मतदारसंघातील परिस्थितीचा, पक्षाची संघटनात्मक बांधणी या दृष्टीने आढावा घेतला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, त्यांची मते जाणून घेतली. लोकांच्या मागण्या, समस्यांची यादी घेतली असून, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सिंह यांनी यावेळी सांगितले.
- Must Read :
- Credit Card Rules: कामाची बातमी! एटीएम आणि क्रेडिट कार्डचे ‘हे’ काम पूर्ण कराच नाहीतर..
- Aadhaar Card : आधार कार्डवर मिळणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज! WhatsApp वर मेसेज व्हायरल; जाणुन घ्या सत्य
राज्य सरकारकडून कामे नाहीत : शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरताना केंद्र सरकारच्या योजनांअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला असता, येथील जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे किंवा माहिती सादर करता आली नाही. त्यावरून येथील पूर्वीच्या सरकारने सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला मिळूच दिला नाही, कामे केलीच नसल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांना माहिती गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी आता दिल्ली गेल्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा बैठक घेणार आहे, असे रेणुका सिंह यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात उत्पादित होणार हिरडा हे तेथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, जुन्नर येथील हिरडा फॅक्टरी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आधीच्या राज्य सरकारने ही फॅक्चरी वाचविणे आणि पर्यायाने आदिवासींना सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलली नाहीत. आता राज्य सरकारकडे या हिरडा फॅक्टरीबाबत आदिवासी बांधवांची भूमिका मांडणार असून, बळ देण्याबाबत विनंती करणार आहे, असे रेणुका सिंह यांनी सांगितले. तरूण खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे (MP Amol kolhe) यांना निवडून दिले. मात्र, त्यांना मतदारसंघासाठी वेळ नाही. ते जाहिरीत, मालिकांच्या शुटिंगमध्ये (advertisement and serial shooting) व्यग्र असतात, अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे, असेही रेणुका सिंह यांनी सांगितले.