Lanke-Vikhe Politics । खासदार लंकेंनी विखेंना पुन्हा डिवचले; पहा नेमके काय केले दिल्लीत

Lanke-Vikhe Politics । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. याला कारणही तसेच होते. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आमने-सामने आले होते.

अटीतटीच्या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव केला. सुजय विखे पाटलांचा पराभव केल्यापासून निलेश लंके चांगलेच चर्चेत आले आहेत. मागील वर्षी नगर-मनमाड, नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी नीलेश लंके यांनी उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते.

अजित पवार यांनी त्यावेळी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करत लंके यांच्याशीही चर्चा करून विशेषतः नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर हे काम लगेच सुरू होते. पण ते पुन्हा थंडावल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता याच मार्गाने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक जातात.

खराब रस्त्यामुळे या भाविकांना मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचेही लंके यांनी गडकरी यांना यावेळी सांगितले. यावर गडकरी यांच्याकडून येत्या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment