Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आदेश जारी; किती असावे कुटुंबाचे उत्पन्न? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेसाठी सतत नवनवीन योजना जाहीर करत असते. प्रत्येक योजनेचा सर्वसामान्यांना खूप लाभ होतो. अशातच राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी आदेश जारी केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न किती असावे? जाणून घ्या.

यासंदर्भातील शासन आदेश २८ जून रोजी जारी केला असून त्यानुसार लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे खूप गरजेचे आहे. यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असावे आणि तो राज्याचा रहिवासी असावा लागेल. सरकारी आदेशात म्हटले आहे की लाभार्थ्याला सक्षम प्राधिकाऱ्याकडून 2.5 लाख रुपये (वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाण) उत्पन्न प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येईल.

असा भरा फॉर्म

हे लक्षात घ्या की ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक ऑनलाइन फॉर्म स्वीकारतील, पडताळणी करतील आणि पोर्टलवर अपलोड करतील. तसेच शहरी भागात अंगणवाडी सेविका व प्रभाग अधिकारी यावर काम करतील. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे अंतिम मान्यता देण्यात येईल. ज्या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नाही, त्यांना अंगणवाडी सेविका मदत करतील.

सरकारी खात्याशी निगडित किंवा सरकारी पेन्शन मिळवणाऱ्या किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1,500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यांचा समावेश असणाऱ्या महिलांचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या चार महिने पूर्वी त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद 46,000 कोटी रुपये इतकी असणार आहे.

Leave a Comment