Ladki Bahin Yojana । मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेची बदलली पद्धत, असा होईल बदल

Ladki Bahin Yojana । राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असे सांगितले आहे. त्यासाठी २.५ कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार? हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत असल्याने आता आजपासून सरकारने नवीन पद्धत तयार केली आहे. नवीन पद्धतीनुसार महिलांची आता ‘यूआरएल’ पद्धतीने खाती उघडली जाणार आहे.

काय आहे यूआरएल पद्धत?

यूआरएल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली होय. ज्या प्रमाणे आयकरदाते यूआरएलवर स्वत:चे खाते हाताळत असतात तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यभरातील महिलांना आपला संपूर्ण तपशील यूआरएल खात्यात भरता येईल. विशेष म्हणजे सर्व्हर ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर पर्याय तयार होईल.

४४ लाख नोंदी

हे लक्षात घ्या की लाडकी बहीण अ‍ॅपवर राज्यातील ४४ लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली असून १० लाख अर्जांची आवेदने खात्यापर्यंत पोचली आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून १५०० रुपये दिले जाणार आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. “या योजनेसाठी वर्षाकाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गरज आहे, पण सरकारने फक्त दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की तीन-चार महिन्यांसाठीच तात्पुरती योजना आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर या योजनेचे काय होईल ते ठाऊक नाही. जर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ, “असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.

Leave a Comment