Ladki Bahin Yojana । राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वी या योजनेची नोंदणी 31 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याची मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथील केले आहे. सरकारने अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आता फक्त रेशनिंग कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे.
या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. पण वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी येत आहेत. जरी आता या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत, याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी माहिती दिली आहे. महिलांसाठी चांगली योजना राबवली आहे. या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही, त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचा फायदा महिलांना होईल.
अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असे सांगितले आहे. त्यासाठी २.५ कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार? हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत असल्याने आता आजपासून सरकारने नवीन पद्धत तयार केली आहे. नवीन पद्धतीनुसार महिलांची आता ‘यूआरएल’ पद्धतीने खाती उघडली जाणार आहे.