Ladaki Bahin Yojana मग बंद होणार का? पहा माजी मुख्यमंत्री चव्हाणांनी नेमके काय मांडले वास्तव

Ladaki Bahin Yojana । राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पण सुरुवातील या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही जाचक अटी ठेवल्या होत्या. आता त्यात बदल करण्यात आला आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. “या योजनेसाठी वर्षाकाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गरज आहे, पण सरकारने फक्त दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की तीन-चार महिन्यांसाठीच तात्पुरती योजना आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर या योजनेचे काय होईल ते ठाऊक नाही. जर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ, “असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.

दरम्यान, सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिशाभूल केली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानी आहे, असे नमूद केले आहे. पण प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्य दरडोई उत्पन्नात अकराव्या स्थानी असून महाराष्ट्रदरडोई उत्पन्नात मागे जाणे याचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Leave a Comment