Take a fresh look at your lifestyle.

..अन्यथा पुरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, महाविकास आघाडीच्या नेत्याने दिला राज्यसरकारलाच इशारा.

हातगणंगलेचे माजी खासदार असलेले राजु शेट्टी कोल्हापूरच्या प्रयाग चिखलीपासून नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा करणार आहेत. ही परिक्रमा तब्बल पाच दिवस चालणार आहे. या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत.

कोल्हापुर : राज्यात कोकण पाठोपाठ कोल्हापुर-सातारा-सांगली भागात पुराने थैमान घातले होते. महापुरात अनेक लोकांच्या शेतीचे, दुकानांचे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे पुरग्रस्त कोल्हापुरकरांची मागणी पुर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष भाजपानेही राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती.
मात्र राज्यशासनाने तातडीने जाहीर केलेली मदत हवेतच विरली. त्यामुळे पुरग्रस्तांच्या मनात राज्य सरकारविषयी नाराजी आहे. त्यामुळे पुरग्रस्तांना हक्काची मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आजपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे.
हातगणंगलेचे माजी खासदार असलेले राजु शेट्टी कोल्हापूरच्या प्रयाग चिखलीपासून नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा करणार आहेत. ही परिक्रमा तब्बल पाच दिवस चालणार आहे. या परिक्रमेत कोल्हापुरातील हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत.
यावेळी महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तर शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ.
पुरग्रस्तांच्या समस्यांसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते असलेले राजू शेट्टी यांनी निर्वाणीचा इशारा दिल्याने त्यांची मागणी मान्य होणार का?
Advertisement

Leave a Reply