कोल्हापूर : कोल्हापुरात अजब आंदोलन पहायला मिळाले. आंदोलकांनी चक्क झणझणीत मिसळ खाऊन? आंदोलन केले. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी मैदानाची दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रार करूनही काही झाले नाही. मैदाना दुरुस्त करण्यासाठी यापूर्वी अनेकदा आवाजही उठवण्यात आला. महापालिका प्रशासनाने २४ लाख रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले.मात्र कसलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही.
यामुळे आज आम आदमी पक्षाच्या वतीने परिसरातील तालीम संघ, फुटबॉल संघाच्या खेळाडू समवेत गांधी मैदानात मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. गांधी मैदानामध्ये रात्रीच्या वेळी मद्य रिचवले जाते. सामिष आहाराची पार्टी केली जाते. यामुळे हे मैदान पार्टी करण्या – सारखेच आहे ; ही भावना व्यक्त करण्यासाठी येथे मिसळ पार्टी आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. कोल्हापुरी मिसळचा तडका , खेळाडूंच्या सहनशीलतेचा भडका अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलस्थळी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंनी धारेवर धरले. त्यांनी मैदानाची दुरुस्ती लवकर करण्याचे आणखी एक आश्वासन दिले.
must read