Kolhapur Murder: कोल्हापूर हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी काकाला अटक

Kolhapur Murder: बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना राज्यात घडली आहे.

माहितीनुसार, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिये गावात उसाच्या शेतातून दहा वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. माहितीनुसार, दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिची हत्या करून तिचा मृतदेह शेतात टाकला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सूरु केली होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने मुलीचा शोध सुरू केला. शिये गावातील तिच्या घरापासून अवघ्या 800 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात गुरुवारी मुलीचा मृतदेह सापडला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, बुधवारी संध्याकाळी तिच्या काकांनी तिला मारहाण केली आणि ती घरातून निघून गेली मात्र मुलीचा लैंगिक छळ झाल्याचा पोलिसांना संशय आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोपीला अटक

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीवर तिच्या काकांनी लैंगिक अत्याचार केले आणि नंतर गळा दाबून खून केल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने अत्याचार आणि खून केल्याची कबुली दिली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, मुलीच्या काकाने तिच्या आईला खोटे बोलले होते की, मुलीला राग आला आणि त्याने शिवीगाळ केल्याने ती निघून गेली.

Leave a Comment