Credit Score : क्रेडिट स्कोअरबाबत ‘ही’ माहिती जाणून घ्याच, होईल बंपर फायदा 

Credit Score: आज बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यानंतर सर्वात आधी CIBIL स्कोअर चेक केला जातो. त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल कि नाही याचा निर्णय होतो. जर तुमचा CIBIL स्कोअर ओके असेल तर तुम्हाला काही मिनिटांमध्ये कर्ज मिळतो मात्र जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्जासाठी खूप त्रास सहन करावे लागते.

यामुळे आजच्या काळात CIBIL स्कोअर ओके असणे खूपच आवश्यक आहे. यामुळे आज आम्ही या लेखात तुम्हाला CIBIL स्कोअरबाबत काही माहिती देणार आहोत जे तुम्ही नेहमी लक्षात ठेवली तर तुम्हाला याचा बंपर फायदा देखील होऊ शकते.

चांगला CIBIL क्रेडिट स्कोअर या पॉइंट्सपर्यंत मर्यादित  

CIBIL स्कोअर क्रेडिट एजन्सीद्वारे जारी केला जातो, जो 300 ते 900 गुणांच्या दरम्यान असतो, 700 वरील CIBIL स्कोअर चांगला मानला जातो, जरी अनेक बँका 750 आणि 800  वरील स्कोअर चांगला मानतात. तर 850 वरील CIBIL स्कोअर खूप चांगला मानला जातो.

राज्यात पुन्हा कमळ ? ठाकरे – पवारांना धक्का, जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

ही कंपनी क्रेडिट स्कोर जारी करते

क्रेडिट स्कोअर जारी करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्यामध्ये CIBIL, Equifax, Experian सारखे विविध क्रेडिट ब्युरो त्यांचे स्वतःचे क्रेडिट स्कोअर जारी करतात, तथापि, अनेक भारतीय बँकांमध्ये, CIBIL च्या क्रेडिट स्कोअरला सर्वाधिक मागणी आहे.

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी खूप वेळ लागतो

तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यास, CIBIL क्रेडिट रिपोर्ट अपडेट होण्यासाठी 7 वर्षे लागू शकतात. जर व्यक्तीने कोणतेही पेमेंट करण्यात उशीर केला, तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर जास्त परिणाम होतो.

MVA मध्ये जागावाटपाचा तिढा कायम, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कोणाला बसणार फटका?

यामुळे तुम्ही नेहमी तुमचा CIBIL स्कोअर ओके ठेवण्याचा प्रत्यन करा नाहीतर तुम्हाला बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

Leave a Comment