Gold Loan घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्याच नाहीतर होणार नुकसान 

Gold Loan : आज अनेकजण सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतणवूक करताना दिसत आहे तर काहीजण अडचणीच्या वेळी सोने  तारण ठेवून कर्ज घेते. जर तुम्ही देखील गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्वाचा ठरणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला गोल्ड लोन घेताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणार आहोत.

कर्ज कोणत्या कारणांसाठी घ्यावे?

मुलांचे शिक्षण, लग्न किंवा इमर्जरसीच्या परिस्थितीत वैद्यकीय खर्च यासारख्या कारणांसाठी तुम्ही सोने घेऊ शकता. इतर कर्जाच्या तुलनेत हे खूपच सुरक्षित आहे. परंतु काही काळासाठी पैशांची गरज असतानाच सुवर्ण कर्ज घेणे योग्य मानले जाते. घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही गोल्ड लोन वापरू शकता.

बँक किंवा NBFC कडून सोने कर्ज घ्या

ही गोष्ट तुमच्या सोयीवर अवलंबून आहे. बँकांमध्ये कमी व्याजदरात गोल्ड लोन उपलब्ध आहे. तर बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या जास्त व्याज आकारतात, परंतु कर्जाची रक्कम देखील जास्त असते. NBFC चा मुख्य व्यवसाय सोन्यावर कर्ज देणे आहे. त्यामुळे तेथे सोने कर्ज लवकर मंजूर होते. तथापि, तुमचे कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही वेगवेगळ्या बँका आणि NBFC चे व्याजदर जाणून घ्या. गोल्ड लोनची चांगली गोष्ट म्हणजे पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन, कॉर्पोरेट लोन यांसारख्या असुरक्षित कर्जांपेक्षा ते खूपच स्वस्त आहे.

रूम राहणार थंड, वीज बिलही येणार खूपच कमी! खरेदी करा पोर्टेबल एसी, किंमत आहे फक्त ….

अतिरिक्त शुल्काकडे लक्ष द्या

गोल्ड लोनला देखील इतर सामान्य कर्जाप्रमाणे प्रोसेसिंग फी असते, जे बँका आणि NBFC नुसार बदलते. काही वित्तीय संस्था त्यात सवलत देखील देतात. प्रोसेसिंग फीवर GST देखील आकारला जातो. अशा काही बँका आहेत ज्या वित्तीय संस्था मूल्यांकन शुल्क देखील आकारतात जे 250 रुपयांपासून सुरू होते. सेवा शुल्क, मेसेज शुल्क आणि सुरक्षा कस्टडी फी सारखे इतर खर्च देखील आहेत.

पुन्हा पेमेंटसाठी कोणता पर्याय निवडावा

कर्ज देणाऱ्या संस्था तुम्हाला कर्जाची रक्कम आणि व्याज भरण्यासाठी अनेक पर्याय देतात. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळत असतील तर तुम्ही EMI मध्ये पैसे देऊ शकता.

तुमच्याकडे पेमेंटसह व्याज भरण्याचा पर्याय आहे. बँका मुख्यतः 3 महिने ते 3 वर्षांपर्यंत सोन्याचे कर्ज देतात, हे तुमच्यावर अवलंबून असते की तुम्हाला किती काळ कर्ज हवे आहे किंवा तुम्ही ते किती वेळेत परत करू शकता.

घरी बसल्या आता करता येणार मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सोन्यावर कर्ज कसे मिळवायचे

सोन्यावरील कर्ज घेण्यासाठी पहिली अट ही आहे की तुम्ही गहाण ठेवत असलेले सोने किमान 18 कॅरेट शुद्ध असावे. बँका किंवा NBFC फक्त दागिने आणि सोन्याच्या नाण्यांवर कर्ज देतात. तुम्ही 50 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची सोन्याची नाणी गहाण ठेवू शकत नाही.

Leave a Comment