IND vs ZIM : भारतीय संघाने झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात संघाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला आणि इतिहास रचला. या सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि गिलने जबरदस्त कामिगरी केली. ज्यामुळे टीम इंडियाने (Team India) हा सामना 10 विकेटने जिंकला. हा सामना जिंकून भारताच्या (India) नावावर एक विक्रम झाला आहे. भारतीय संघाने काल आपल्या नावावर केलेल्या खास विक्रमाबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.
खरं तर, भारताने झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने पराभव केल्यावर भारतीय क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात प्रथमच भारतीय संघाने एका वर्षात दोनदा 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतीय संघासमोर 190 धावांचे आव्हान ठेवले होते. जे केएल राहुलच्या (KL Rahul) संघाने एकही विकेट न गमावता जिंकले.
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी दमदार होत आहे. 2013 पासून भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध एकही सामना हरलेला नाही. आपल्या नावावर 13 सामने जिंकण्यात यश आले आहे. लागोपाठच्या कोणत्याही संघाबाबत बोलायचे झाले तर त्याआधी बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) 12 सामने टीम इंडियाने जिंकले होते. या सामन्यात दीपक चहरने (Dipak Chahar) शानदार गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या. मालिकेतील दुसरा सामना 20 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि टीम इंडिया ज्या प्रकारे कामगिरी करत आहे, ते तीनही सामने 10 विकेटने तर जिंकणार नाही ना अशी चर्चा आता होत आहे.
झिम्बाब्वे मालिकेनंतर आशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. येथे आशियातील क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धांआधी भारतीय संघासाठी झिम्बाब्वे दौऱ्याचा फायदाच होणार आहे.