KKR : दोन वेळच्या आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास (Litton Das) कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे आणि आता तो कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सामन्यांसाठी उपलब्ध होण्याची फारशी शक्यता नाही. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्याला 4 मे पर्यंत ना-हरकत प्रमाणपत्र जारी केले होते.
केकेआर संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याच्या कुटुंबातील वैद्यकिय कारणांमुळे तो आज सकाळी ढाक्याला रवाना झाला.” तो कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती नाही.या 28 वर्षीय फलंदाजाला केकेआरने गेल्या वर्षी लिलावात त्याची मूळ किंमत 50 लाख रुपयांना विकत घेतले होती. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त एकच सामना खेळला होता.
लिटन दासने दिल्लीविरुद्ध ४० धावा केल्या
जेसन रॉयसह डावाची सुरुवात करताना लिटन दासने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केवळ चार धावा केल्या आणि यष्टिरक्षक म्हणून त्याने स्टंपिंगच्या दोन संधी गमावल्या. दिल्लीने हा सामना चार गडी राखून जिंकला आणि सलग पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली.