Kisan Credit Scheme । शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत आहेत. अशातच आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता दुहेरी आर्थिक लाभ मिळेल.
28 फेब्रुवारी 2024 सरकार PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी करेल. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात. हे लक्षात घ्या की पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट योजनेचा लाभही मिळतो. यात शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. शेतकऱ्याने वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली तर त्यालाही अनुदानाचा लाभ मिळतो.
किसान क्रेडिट योजना
जर कोणत्याही शेतकऱ्याला पशुपालन, मत्स्यपालन किंवा शेतीशी संबंधित कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास तो शेतकरी क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. हे अल्प मुदतीचे कर्ज असून यात शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा मिळते. शेतकऱ्यांना हे कर्ज 2 टक्के ते 4 टक्के व्याजदराने दिले जाते.
हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वेळ मिळतो. कमी व्याजदर, लवचिक परतफेड पर्याय, विमा संरक्षण असे अनेक फायदेही या योजनेत देण्यात येतात. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खाते, स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्डचा लाभ मिळतो.
असा करा अर्ज
- या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता.
- या फॉर्मसोबत तुम्हाला आयडी-प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ अशी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
- आता फॉर्म भरून बँकेत जमा करा.
- यानंतर फॉर्मची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड सहज मिळेल.