Hamas Chief Ismail Haniyeh : गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये दोन्ही बाजूच्या आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार इस्रायलने मोठी कारवाई करत इराणमध्ये हमासचे राजकीय नेते इस्माइल हनीयेह यांची हत्या केली आहे.
माहितीनुसार, इस्माईल हानिया यांची इराणची राजधानी तेहरानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून हत्या केली. या हल्ल्यात हानियासोबत त्यांच्या अंगरक्षकही मारला गेला. इराणच्या एलिट फोर्स इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या हत्येला दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे, खुद्द हमासने आपल्या नेत्याच्या हत्येला दुजोरा दिला आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर या हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हानियाच्या हत्येचे वृत्त समोर आल्यानंतर इस्रायलने हाय अलर्ट जाहीर केला आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने म्हटले आहे की ते कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
इस्माईल हानिया हे पॅलेस्टाईनच्या गाझा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या हमास या इस्लामिक गटाचे नेते होते. ते इराणच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी तेहरानला पोहोचले होते. मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात हानिया इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी आणि इतर अनेक बड्या नेत्यांसोबत देखील दिसले होते.
गेल्या वर्षी 07 ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. या घटनेनंतरच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यांनी गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि हजारो लोक मारले गेले. असे मानले जाते की 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने तेहरानमध्ये त्यांची हत्या केली.
IRGC ने आपल्या निवेदनात काय म्हटले?
आयआरजीसीने म्हटले आहे की, ‘पॅलेस्टाईन, मुस्लिम जगता, रेझिस्टन्स फ्रंटचे लढवय्ये आणि इराण यांच्याप्रती शोक व्यक्त करताना आम्हाला कळवायचे आहे की, आज (बुधवारी) सकाळी या संघटनेचे राजकीय प्रमुख डॉ. इस्माईल हनिया यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला. या घटनेत हानिया आणि त्यांचा एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल म्हणाला- आम्ही पूर्णपणे तयार आहोत
हमास प्रमुखाच्या हत्येचे वृत्त समोर आल्यानंतर इस्रायलने सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले, ‘आम्ही इस्रायली लोकांसाठी कोणताही नवीन आपत्कालीन आदेश जारी केलेला नाही. याचे एक कारण म्हणजे इस्रायली अधिकारी हमासकडून तत्काळ प्रत्युत्तराच्या कारवाईची अपेक्षा करत नाहीत.
आम्ही मोठ्या युद्धाशिवाय शत्रुत्व सोडवण्यास प्राधान्य देतो, परंतु इस्रायली सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सतर्क आहे.