Kidney health : अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यातील काही आजार खूप जीवघेणे असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अनेकांच्या किडनीचे आरोग्य खराब होते. तुम्ही आता त्याची घराच्या घरी तपासणी करू शकता.
घरच्या घरी तपासा किडनीचे आरोग्य
समजा तुम्ही घरी तुमच्या किडनीची चाचणी केली तर तुमची रुग्णालयात सतत जाण्यापासून सुटका होते. हे हृदय, मधुमेह किंवा तीव्र मूत्रपिंडाचा आजार व्यवस्थापित करण्यात मदत करते. घरी चाचणी करणे खूप फायदेशीर असते.
असे तपासा किडनीचे कार्य
घरी स्वतः किडनीच्या कार्याची चाचणी करणे खूप सोपे आहे. खरंतर बाजारात एक किट उपलब्ध असून तुम्ही ज्याद्वारे मधुमेह तपासणीप्रमाणेच बोटातून रक्त काढले जाते. यानंतर हे रक्त किटला लावले जाते. तसेच तुम्ही किडनीचे कार्य तपासू शकता.
जाणून घ्या किडनी फंक्शन चाचणीची आव्हाने
घरच्या घरी किडनी तपासणीची सुविधा चांगली मानली जाते पण यामध्ये देखील काही आव्हाने आहेत. सर्वात अगोदर या चाचणीचा निकाल किती अचूक आहे, कारण पुढील प्रक्रिया त्यावर अवलंबून आहे. त्यानुसार आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे, योग्य चाचणी आणि योग्य निकाल खूप महत्वाचा आहे.
अशी घ्या किडनीच्या आरोग्याची काळजी
- नियमित करा फळे आणि भाज्यांचे सेवन.
- तुमचे वजन नियंत्रित करावे.
- संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त, कमी सोडियमयुक्त पदार्थ नियमितपणे खावा.
- आवश्यक प्रमाणात पुरेशी झोप घ्या.
- शारीरिक हालचाली करा.
- तणाव, मधुमेह, बीपी आणि हृदयविकार व्यवस्थापित करा.
- दारू आणि धूम्रपान टाळा.