Kidney Damage Signs : किडनी हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक समस्यांचा त्रास होतो. आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
आजकाल, प्रत्येकाच्या जीवनशैलीचा आपल्या किडनीवर एक प्रकारे परिणाम होतो. किडनीशी संबंधित विविध आजार होऊ लागतात, जसे की किडनी खराब होणे, किडनी निकामी होणे, किडनी कमकुवत होणे इ.
हे लक्षात घ्या की किडनी खराब होणे ही सर्वात गंभीर समस्या आहे आणि त्याची लक्षणे रात्रीच्या वेळी दिसू लागतात. या कारणामुळे त्यांना वेळेवर ओळखणे आणि उपचार घेणे आणि समस्या बिघडण्याआधी प्रतिबंध करणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया किडनीच्या संबंधित लक्षणांची संपूर्ण माहिती.
किडनी खराब होण्याची लक्षणे
तुम्हाला दिवसभर खूप थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर हे किडनी खराब होण्याचे लक्षण असण्याची शक्यता आहे. किडनी शरीरातून कचरा बाहेर काढू शकत नाही, काहीही फिल्टर करण्यास सक्षम नसते, तेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तुम्हालाही असेच वाटत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
किडनीच्या आजारामुळे झोपेशी संबंधित समस्या सुरू होतात. जर एखाद्याला बऱ्याच काळापासून अशी समस्या भेडसावत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
रात्री झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास हे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते. या समस्येमध्ये आपल्या शरीरात द्रव साचायला सुरुवात होते. या कारणास्तव, शरीरातील द्रव पदार्थामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.