Kia EV3 GT-Line: Kia चा धमाका, 23 मे ला लॉन्च करणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त 20 लाख

Kia EV3 GT-Line : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात लोकप्रिय ऑटो कंपनी Kia एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे.

या कारमध्ये तुम्हाला उत्तम फीचर्ससह दमदार रेंज देखील कंपनीकडून ऑफर करण्यात येणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार किया 23 मे रोजी आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Kia EV3 GT-Line भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. चला मग जाणून घेऊया या कारमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या फीचर्स पाहायला मिळेल.

दमदार डिझाइन आणि स्पोर्टी लुक

Kia EV3 GT-Line ची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची आकर्षक डिझाइन.  EV3 च्या तुलनेत यात अधिक बोल्ड लुक देण्यात आले आहे.

सिग्नेचर Kia EV लूक समोर दिसेल, ज्यामध्ये ब्लँक-ऑफ ग्रिल, L-shaped LED DRLs आणि क्यूबिकल-आकाराचे LED हेडलॅम्प आहेत.

त्याच्या बाजूंना स्क्वेअर-ऑफ व्हील आर्च, पुन्हा डिझाइन केलेले ब्लॅक-आउट अलॉय व्हील, ब्लॅक-आउट पिलर आणि फ्लश-फिटिंग फ्रंट डोअर हँडल आहेत. रियरमध्ये L-आकाराचे LED टेललॅम्प, मोठा बंपर, रूफ स्पॉयलर, शार्क फिन अँटेना आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.

Kia EV3 GT-Line इंटीरियर

Kia EV3 GT-Line चे इंटीरियर हे स्टँडर्ड व्हर्जन सारखेच आहे, परंतु काही महत्त्वपूर्ण बदलांसह. सर्वात लक्षणीय बदल म्हणजे ऑफ-सेट Kia लोगो असलेले तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील.

Kia EV3 GT-Line इंटीरियर फीचर्स 

 यात ट्विन 10.25-इंचाचा डिस्प्ले, फ्लोटिंग सेंटर कन्सोल, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जर आणि ऑटो-डिमिंग IRVM यांचा समावेश आहे.

Kia EV3 GT-Line किंमत

कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण या दमदार कारची किंमत 20 ते 25 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment