Kia Electric SUV EV3 : 600km रेंज आणि 31 मिनिटांत चार्ज होते Kia ची जबरदस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स

Kia Electric SUV EV3 : 600km रेंज, 31 मिनिटांत चार्ज होणारी Kia ने जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीची ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. विशेष म्हणजे कारमध्ये 5 इंचाचा एसी पॅनल असेल.

होईल 31 मिनिटांत चार्ज

नवीन Kia EV3 इलेक्ट्रिक SUV ला 10-80% चार्ज होण्यासाठी फक्त 31 मिनिटे लागतात. नवीन कार पूर्ण चार्ज केल्यावर 600 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. त्यात एरो डायनॅमिक डिझाइन दिसत असून या नवीन मॉडेलमध्ये 12.3 इंच क्लस्टर आहे. या कारमध्ये 5 इंचाचा एसी पॅनलही असणार आहे. याशिवाय या कारमध्ये 12.3 इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले देखील दिला आहे. म्हणजेच डॅशबोर्ड पूर्णपणे डिस्प्लेने सजलेला असेल.

स्टाइलिश डिझाइन

डिझाईनच्या बाबतीत तुम्हाला नवीन Kia EV3 इलेक्ट्रिक SUV आवडेल. कारण ही कार थोडी स्पोर्टी आहे. यात समोरून बोल्ड लूक आहे. त्याची रचना थोडी बॉक्सी शैलीमध्ये असून ते टेलगेट सोबत, सिग्नेचर स्टार मॅप लाइटिंग देखील दिसत आहे.

यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, रूफ रेल आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स असतील. सिंगल पेंट स्कीम व्यतिरिक्त ड्युअल पेंट स्कीम देखील यामध्ये समाविष्ट केले जातील. तर त्याची लांबी 4,300 मिमी, रुंदी 1,850 मिमी आणि उंची 1,560 मिमी असेल.

मिळेल जबरदस्त बॅटरी पॅक

नवीन Kia EV3 दोन बॅटरी पॅकसह आणले जातील. यात 58.3kWh चा बॅटरी पॅक आणि 81.4kWh ची मोठी बॅटरी असणार आहे. ही एका चार्जवर 600 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. पण हे लक्षात घ्या की नवीन Kia EV3 भारतात कधी लॉन्च होईल याबद्दल अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हे देखील लवकरच उघड होईल.

Leave a Comment