Kia Electric Cars : हल्ली इलेक्ट्रिक वाहनांचा वापर खूप वाढला आहे. मागणी आणि गरज लक्षात घेता इलेक्ट्रिक कंपन्या आपल्या कार्स लाँच करत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात लवकरच Kia च्या 3 इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालताना पाहायला मिळतील.
किआ केरेन्स EV
दक्षिण कोरियन ऑटो मेकर कंपनी किआ आपली 2025 पर्यंत Carens वर आधारित इलेक्ट्रिक MPV सादर करण्याची तयारी करत आहे. ही आगामी ई-एमपीव्ही क्लॅव्हिसच्या इलेक्ट्रिक आवृत्तीसह अनेक घटक सामायिक करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. भारतीय बॅटरी उत्पादक Exide सोबतची त्यांची भागीदारी ही कुटुंबाभिमुख MPV विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
किआ क्लॅव्हिस ईव्ही
IC-इंजिनसह Kia Clavis भारतासह परदेशात आणि विविध ठिकाणी चाचणी करताना पाहायला मिळाली. 2025 च्या सुरुवातीला भारतासह अनेक बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्याच्या योजनांसह, या वर्षाच्या अखेरीस त्याचा जागतिक प्रीमियर होण्याची शक्यता आहे. Clavis च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची चाचणी चालू आहे आणि टाटा पंच EV ला टक्कर देण्यासाठी येत्या वर्षी 400 किमी पेक्षा जास्त श्रेणीसह बाजारपेठेत येऊ शकते.
Kia EV9
मागील वर्षी Kia EV9 जागतिक बाजारपेठेसाठी सादर केली होती. भारतात त्याचे प्रक्षेपण 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. ती पूर्णपणे भारतीय बाजारपेठेत आयात करण्यात येईल. EV9 WLTP सायकलमध्ये 541 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सिंगल आणि ड्युअल-मोटर कॉन्फिगरेशनमध्ये खरेदी करता येईल.