Kia Carens: तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी नवीन 7- सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आज बाजारात Maruti Ertiga ला टक्कर देणारी कार उपलब्ध आहे. ज्याला तूम्ही अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करु शकतात.
या MPV चे नाव Kia Carens आहे. कंपनीने अनेक इंजिन पर्याय आणि अनेक प्रीमियम फीचर्ससह ही एमपीव्ही बाजारात आणली आहे. या एमपीव्हीचा लूक अतिशय आकर्षक दिसत आहे.
या रिपोर्टमध्ये तुम्ही Kia Carens शी संबंधित सर्व महत्त्वाच्या माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Kia Carens इंजिन तपशील
कंपनीने Kia Carens तीन इंजिन पर्यायांसह अनुक्रमे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन सादर केले आहे. ज्याची क्षमता अनुक्रमे 160PS/253nm, 115PS/242nm आणि 116PS/250nm आउटपुट जनरेट करण्याची आहे.
यामध्ये तुम्हाला अनुक्रमे इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड मिळतात. कंपनीने हा MPV 6iMT आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशन पर्यायांसह बाजारात आणला आहे. यामध्ये तुम्हाला 6 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनचा पर्याय देखील मिळतो. मात्र Ertiga प्रमाणे यामध्ये CNG चा पर्याय देण्यात आलेला नाही. यामध्ये तुम्हाला चांगले मायलेज मिळते.
Kia Carens फीचर्स आणि किंमती
त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्राइवर-सीटर हाइट अडजस्टमेंट, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि बोस साउंड सिस्टम यांचा समावेश आहे.
ऑटोमॅटिक एसी, पेन सनरूफ, 64 अॅम्बियंट लाइटिंग, एअर प्युरिफायर, दुस-या रोसाठी इलेक्ट्रिक डबल फोल्डिंग सीट्स, 6 एअरबॅग्ज, तिन्ही रोसाठी एसी व्हेंट्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फीचर्स आहेत. या MPV ची बाजारातील किंमत रु. 10.45 लाखांपासून सुरू होते आणि रु. 18.95 लाखांपर्यंत जाते.