Congress : केरळमध्ये (Kerala) काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चा विस्तार करण्याची पक्षाची योजना आहे. याआधी महाआघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना परत आणण्याची तयारी काँग्रेस करत आहे. कार्यक्रमा दरम्यान, काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीवर (LDF) जोरदार टीका केली आणि केंद्राबरोबर संबंध असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन (K. Sudhakaran) यांनी शिबिरात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, की “एलडीएफ मधील बरेच लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यापैकी बरेच जण अस्वस्थ आहेत. आम्ही त्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन UDF चा विस्तार करू. ते म्हणाले की, यूडीएफने कोणत्याही पक्षासाठी दरवाजे बंद केलेले नाहीत.

सुधाकरन यांनी विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन (P. Vijayan) यांच्या सरकारवर उजव्या विचारांचे धोरण आणि विचारसरणीवर काम केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, की “एलडीएफच्या सलग सरकारने केरळसाठी आपत्ती आणली. केरळला या आपत्तीतून वाचविण्यासाठी काँग्रेस मदतीची जबाबदारी घेण्यास तयार आहे. दिल्लीत बसलेल्या श्रेष्ठींना खूश करण्यासाठी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) कार्यालयावर हमला करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बूथ पातळीपर्यंत फेररचना करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पक्षाची जिल्हा आणि मतदारसंघ पातळीवर राजकीय बाबींवर समिती असेल. केरळमधील पक्षाचा एक प्रशिक्षण विभाग देखील असेल, ज्यामध्ये कार्यकर्त्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित वर्ग आयोजित केले जातील. तक्रारींबाबत काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत समिती असेल.

केरळ काँग्रेस (एम) ने UDF सोडलेल्या पक्षांना परत आणण्याच्या प्रस्तावावर पक्षावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. KC(M) नेते स्टीफन जॉर्जड म्हणाले की, ‘आमच्या पक्षाला UDF मधून बाहेर का फेकले गेले’ हे काँग्रेसने आधी उघड केले पाहिजे. विशेष म्हणजे यूडीएफने 2020 मध्ये KC(M) ला आघाडीतून बाहेर केले होते. तसेही देशात सध्या काँग्रेसची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. भाजप तर सोड पण राज्या-राज्यांतील प्रादेशिक पक्षही काँग्रेसला आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची राजकीय वाटचाल आधिकच कठीण बनली आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version