KCC Scheme : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा देशभरातील कोट्यवधी शेतकरी लाभ घेत आहेत. अनेक शेतकऱ्यांना काही योजनांबद्दल माहिती नसते. सरकारने काही दिवसांपूर्वी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते.
विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरले तर या कर्जावरील व्याजदरही कमी राहतो. शेतीसाठी इतके स्वस्त कर्ज इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुलभ कर्ज मिळण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 1988 मध्ये केंद्र सरकारने RBI आणि NABARD सोबत एक नवीन योजना सुरू केली. या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना असे असून याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्यात येते.
किसान क्रेडिट कार्ड योजना
शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध शेतीसाठी पैशांची गरज असते. या खास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते, हे लक्षात घ्या की कर्जाची रक्कम वाढली की व्याजदर वाढतो.
किसान क्रेडिट कार्डवरील सामान्य व्याज टक्केवारी 9% आहे. तर KCC योजनेंतर्गत यावर शासनाकडून दोन टक्के अनुदान देण्यात येते. जर तुम्ही एक वर्षापूर्वी परतफेड केली तर तुम्हाला तीन टक्के प्रोत्साहन मिळेल. म्हणजे तुमच्या कर्जावरील व्याज 4% इतके होईल. देशातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात सोपी कर्ज योजना आहे हे लक्षात ठेवा.