KCC : शेतकऱ्यांना सरकार देतंय 3 लाख रुपयांचे कर्ज, असा घ्या लाभ

KCC : केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. आता तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला सरकार 4 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांचे कर्ज देईल.

मिळते व्याजदरात सवलत

शेतक-यांना नेहमी कृषी कार्यांसाठी आर्थिक मदतीची गरज असते. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरात आणि सोप्या पद्धतीने कर्ज देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.

जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डचे फायदे

1. KCC धारकाला मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आले तर त्याला रु. 50,000 पर्यंत, दुसऱ्या जोखमीच्या बाबतीत रु. 25,000 पर्यंत कव्हरेज मिळते.
2. पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डसह बचत खाते देण्यात येते. ज्यावर त्यांना चांगल्या दराने व्याज मिळते, त्यांना स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड मिळते.
3. कर्जाची परतफेड करताना बरीच लवचिकता असून कर्ज वाटप अगदी सहजपणे करण्यात येते
4. शेतकऱ्यांकडे हे क्रेडिट 3 वर्षांसाठी राहते.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत-

स्टेप 1- यासाठी, तुम्हाला सर्वात अगोदर ज्या बँकेतून KCC घ्यायचे आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जा.
स्टेप 2- येथे किसान क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा.
स्टेप 3- यानंतर Apply पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4- आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, तो भरा.
स्टेप 5- यानंतर सबमिट करा.
स्टेप 6- सर्व तपशीलांची पडताळणी करण्यासाठी बँक तुमच्याशी 2 ते 3 दिवसांत संपर्क करेल आणि तुम्हाला KCC मिळेल.

कुठे मिळेल किसान क्रेडिट कार्ड

– प्रादेशिक ग्रामीण बँक
– नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
– सहकारी बँक
– बँक ऑफ इंडिया
– इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
– स्टेट बँक ऑफ इंडिया

Leave a Comment