Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Elections) जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष काँग्रेस (Congress) आणि जेडीएसकडून प्रचार सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेते आघाडीवर आहेत. आपल्या उमेदवारांसाठी ही नेते मंडळी मैदानात उतरली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
राहुल गांधी प्रचारा दरम्यान सत्ताधारी भाजपावर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत. कामकाजाच्या बाबतीत कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य सरकार आहे. या सरकारचे मंत्री सरकारी कंत्राटांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटक दौऱ्यावर ही माहिती दिली.
राहुल गांधी म्हणाले, समाजासमोर सत्य बोलणे सोपे नाही. त्यासाठी अनेक आव्हाने आणि धमक्यांना सामोरे जावे लागते. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, भाजप आणि आरएसएस द्वेष आणि हिंसेचे वातावरण निर्माण करत आहे, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.
कर्नाटकच्या मैदानात राष्ट्रवादी
कर्नाटक विधानसभा (Karnataka Elections) निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्येच (Congress) लढत होईल असे मानले जात असतानाच अनेक प्रादेशिक पक्षांनी या रणांगणात उडी घेतली आहे. आम आदमी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही कर्नाटक निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही मोजक्याच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
काँग्रेस जिंकणार ?
कर्नाटकात सध्या परिस्थिती बदलली आहे. येथे काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती मला माहित आहे. मी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यावरून असे दिसत आहे की यंदा भाजप पराभूत होईल आणि काँग्रेस सत्तेवर येईल. कर्नाटकातील लोकांनाही आता बदल हवा आहे.
काँग्रेसचा मोठा निर्णय
कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकांचे (Karnataka Elections) आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस (Congress) पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कर्नाटक युनिटच्या कार्यकारिणीसाठी नवीन अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने रविवारी बी. एन. चंद्रप्पा यांची राज्याच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. सध्या केशवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.