Karnataka Election: उद्या 10 मे रोजी बहुचर्चित कर्नाटका विधानसभा साठी मतदान पार पडणार आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत मोठं आवाहन केलं आहे.
कर्नाटकामध्ये सत्ता राखण्यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करत आहे. यातच पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ जारी करत आवाहन केल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
या व्हिडीओमध्ये पीएम मोदींनी आवाहन केले आहे की, लोकांनी कर्नाटकातील तीन वर्षांचे डबल इंजिन सरकार पाहिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, कोरोनासारखी महामारी असतानाही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी 90 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक आली, तर मागील सरकारच्या काळात हा आकडा केवळ 30 हजार कोटी होता.
“कर्नाटकचे ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट”
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “विकसित भारताच्या या संकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी कर्नाटकमध्ये ऊर्जा भरलेली आहे. सध्या भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आम्हाला भारताला लवकरात लवकर टॉप 3 अर्थव्यवस्थेत समाविष्ट करायचे आहे.” हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कर्नाटकची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल, ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल. कर्नाटक उद्योग, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात नंबर वन व्हावे अशी आमची इच्छा आहे.
बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकर्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी भाजप सरकारही अथकपणे काम करेल. कर्नाटकला कृषी क्षेत्रात नंबर वन बनवण्याचा भाजपचा निर्धार आहे.
“प्रत्येक कन्नडिगाच्या डोळ्यातील स्वप्न, माझे स्वप्न”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “डबल इंजिन सरकार स्थापन झाल्यानंतर, कर्नाटकात कनेक्टिव्हिटी, राहणीमान सुलभता, व्यवसाय करण्यास सुलभता यासंबंधी घेतलेले निर्णय, सुरू केलेले प्रकल्प कर्नाटकला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचा आधार बनतील. कर्नाटक आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची जबाबदारी भाजप सरकारची आहे.
कर्नाटकातील सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधा सुधारणे, वाहतूक व्यवस्था आधुनिक करणे.आमच्या गावातील आणि शहरांमधील जीवनमान सुधारणे,महिला आणि तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करणे.माझे स्वप्न आहे. प्रत्येक कन्नडिगाच्या डोळ्यातील स्वप्न. तुमचा संकल्प हाच माझा संकल्प आहे.”
विशेष म्हणजे 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.