BJP : म्हैसूरूचे खासदार आणि भाजप (BJP) नेते प्रताप सिम्हा (Pratap Simha) यांनी लोकांना १ जूनपासून वीजबिल न भरण्यास सांगितले आहे. त्यांनी काँग्रेसला (Congress) मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली आणि विजेचा वापर 200 युनिटपेक्षा कमी असेल तर बिल भरू नये, असे सांगितले.
खरे तर काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात दिले होते. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच लवकरच सर्व हमींची अंमलबजावणी करू असे सांगण्यात आले.
आता भाजपने सरकारकला ३० जूनपर्यंत वेळ दिला आहे. पुढील महिन्यापर्यंत मोफत वीज योजना लागू न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपने दिला आहे. भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी मोफत वीज योजना लागू करण्याच्या मागणीसाठी म्हैसूर-कोडागू भागात धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.
200 युनिटपेक्षा जास्त वापर असेल तर दोनशे युनिट सोडून अन्य युनिटचे वीजेचे पैसे द्यावेत असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप नेते म्हणाले, ‘1 जूनपासून तुम्ही 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरत असाल तर कृपया बिल भरू नका. १ जूनपासून मी म्हैसूर आणि कोडागु भागात आंदोलन सुरू करणार आहे.