Karnataka Election Results : कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने (Karnataka Election Results) कसरत सुरू केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांत काँग्रेस (Congress) बहुमताच्या आकड्यावरून पुढे आहे. अशा स्थितीत काँग्रेसने विजयी आमदारांना थेट बंगळुरू गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कर्नाटकात मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालामुळे उत्साही झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दुसरीकडे पक्षाने सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे.
कर्नाटकातील विजयी आमदारांना थेट बेंगळुरू गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल.
दुसरीकडे यावेळेपर्यंतच्या मतमोजणीचे बोलायचे झाले तर मतमोजणी तीन तासांनंतरही काँग्रेस 116 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकात भाजपचा धुव्वा उडाला आहे. पक्ष सध्या 72 जागांवर आघाडीवर आहे. 224 जागांसह कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागा जिंकणे आवश्यक आहे.
आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेसची कर्नाटकात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते डीके शिवकुमार (DK Shivkumar) एकामागून एक फोनवरून आमदारांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे. दुसरीकडे, ऑपरेशन लोटस टाळण्यासाठी काँग्रेस आधीच पूर्ण तत्परता दाखवत आहे. दुसरीकडे भाजप नेते जेडीएस नेतृत्वाच्या सतत संपर्कात आहेत.
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयी आमदारांना थेट बेंगळुरू गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी बेळगावी, धारवाड आणि हुबळी येथे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना बेंगळुरूला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केला आहे.