Kangana Ranaut : भारतीय जनता पार्टीने रविवारी आपली पाचवी यादी जाहीर केली या पाचव्या (BJP Fifth Candidate List) यादीत भाजपने एकूण 111 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha Constituency) बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत हिला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे. अशा पद्धतीने कंगना राणावतने अखेर राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
तसं पाहिलं तर कंगना राणावत ही भाजप समर्थक म्हणून ओळखली जाते. तिने अनेक प्रसंगात भाजपाची उघडपणे बाजू घेतली आहे. कंगना राणावत लवकरच राजकीय कारकीर्द सुरू करणार अशा चर्चा होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अभिनेत्रीला थेट लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)मिळालेल्या तिकीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Kangana Ranaut
कंगना राणावत हिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. 2006 मध्ये फॅशन या चित्रपटातून कंगनाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. आता कंगनाला चित्रपटसृष्टीत येऊन 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. कंगना राणावतचा जन्म हिमाचल प्रदेशामध्ये झाला आणि या वेळेस भाजपने तिला तिच्या जन्मभूमीतून तिकीट दिले आहे हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल.
BJP Fifth Candidate List : पाचव्या यादीत भाजपाचा माइंडगेम! तब्बल ‘इतक्या’ खासदारांना तिकीट नाकारले
कंगना राणावतचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुरजपूर या गावात झाला. अलीकडेच तिने आपला 37 वा वाढदिवस देखील (kangana Ranaut Birthday) साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिला राजकारणात नवीन इनिंग सुरू करण्याची ऑफर मिळाली या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे.
Kangana Ranaut
अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता राजकारणातून नवीन इनिंग सुरू करण्यास कंगना सज्ज झाली आहे. कंगना सध्या चित्रपटात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर कमालीची ॲक्टिव्ह आहे. आज परिस्थिती अशी आहे की तिचे चित्रपट कोणतेही असो त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच चाहत्यांचा देखील चित्रपटांना प्रतिसाद राहिलेला नाही. अशा परिस्थितीत आता चित्रपटांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न कंगनाकडून केला जात आहे. आता आगामी काळात कंगना चित्रपट सोडणार की कमी चित्रपट करणार यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. परंतु राजकारणात नवीन करिअर करण्यासाठी कंगना सज्ज झाली आहे.