Jobs for women । महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘येथे’ तब्बल 14,690 पदांसाठी भरती

Jobs for women । केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्याचा महिलांना देखील खूप फायदा होतो. राज्यातील लाखो महिला या योजनांचा लाभ घेत आहेत. दरम्यान, राज्यात महायुती सरकर महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत असून नुकतीच सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली आहे.

या योजनेची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. असे असतानाच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे. आदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीची 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.

हे लक्षात घ्या की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदे 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. लवकरच याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दर महिना 1500 रूपये बँकेच्या खात्यावर जमा होतील. पण काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येते आहे. याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नसल्याने त्यांना सहकार्य करत बॅकांना खाते उघडून देण्यासाठी मदत करावी आणि तसे आदेश बँकांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. पण वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी येत आहेत. जरी आता या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत, याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी माहिती दिली आहे. महिलांसाठी चांगली योजना राबवली आहे. या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही, त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचा फायदा महिलांना होईल.

Leave a Comment