Jobs alert: पुणे (pune): कृषीरंग (www.krushirang.com) या वाचकप्रिय मराठी न्युज पोर्टलमध्ये (famous marathi news portal) बातमीदार (reporters jobs) आणि कंटेंट रायटर्स (content writer jobs) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राज्यभरातील प्रमुख शहरे, विविध जिल्हे आणि तालुका पातळीवर पत्रकार (journalist jobs) नेमणूक केली जाणार असून त्यासाठी तातडीने आपले अर्ज इमेलद्वारे पाठवण्याचे आवाहन पब्लिशर माधुरी सचिन चोभे यांनी केले आहे.
https://twitter.com/krushirang/status/1563021692561412096?t=rVM6B058Os69OedSIFunJA&s=19
त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई (mumba), पुणे, नाशिक (nashik), कोल्हापूर (kolhapur), औरंगाबाद (aurangbad), नागपूर (nagpur), नांदेड (nanded), सोलापूर (solapur), अहमदनगर (ahmednagar), जळगाव (jalgaon) या लोकेशनसह इतर प्रमुख जिल्हे आणि तालुका स्तरावर बातमीदार भरणे आहेत. यासह कृषी व सहकार (agriculture and cooperation), अर्थ, व्यवसाय व शेअर बाजार (business and share market), लाईफस्टाईल (lifestyle), विज्ञान व पर्यावरण (science and environment), राजकीय (political news), क्रीडा (sports) आदी विषयावर लेखन करणारे कंटेंट रायटर्स यांनाही टीम कृषीरंग यामध्ये सहभागी होण्याची संधी खुली आहे.
https://twitter.com/krushirang
यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे : शिक्षण – कोणत्याही विषयातील पदवी, वय : किमान १८ वर्षे पूर्ण, पत्रकारिता पदवी / पदविका असल्यास प्राधान्य, कोणत्याही राजकीय पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता नसावा. मानधन स्वरूप :
₹ 6000 ते 12000 आणि कामाचे स्वरूप : पूर्णवेळ / अर्धवेळ / न्युज बेस असे आहे. इच्छुकांनी आपले अर्ज आणि समवेत बायोडेटा krushirang@gmail.com यावरच पाठवावेत. आपण कोणत्या पद्धतीने काम करू इच्छिता म्हणजे कामाचे स्वरूप याबाबत स्पष्ट कळवावे. इतर जिल्हे आणि तालुका पातळीवर काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तसा स्पष्ट उल्लेख करावा. त्यांनाही संधी देण्यात येईल, असे माधुरी चोभे यांनी म्हटले आहे.