Job Recession: वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी (Diwali Festival). प्रत्येक जण या उत्सवाची आतुरतेनं वाट पाहतो. कर्मचाऱ्यांसाठी (Employees) तर दिवाळी ही आनंदाची पर्वणीच ठरते. कारण दिवाळीत बोनससह पगारवाढची प्रतीक्षा पूर्ण होत असते. अशात यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आली आहे. दिवाळी तोंडावर असताना खासगी क्षेत्रात (Private sector) काम करणाऱ्या लोकांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. जगभरात आर्थिक मंदीचं (Recession) सावट गडद होत आहे. अशात बऱ्याच बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु (Cost Cutting) झाली आहे. याचाच भाग म्हणजे एका मोठ्या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.spiceworks.com/tech/tech-general/news/intel-planning-layoffs-q3/
समोर आलेल्या माहितीनुसार, सेमीकंडक्टर चिप (Semiconductor chip) निर्मिती क्षेत्रातील इंटेल (Intel) कंपनीने हजारो कर्मचारी कपातीचा निर्णय घेलात आहे. याबाबत ब्लूमबर्गचा हवाला देत रॉयटर्सनं देखील वृत्त दिले आहे. या माहितीनुसार, इंटेल कॉर्प (Intel Corp) हजारो कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. कंपनी जवळपास २० टक्के कर्मचारी कमी करणार आहे. यात सेल्स (Sales), मार्केटिंग (Marketing) आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कंपनीच्या सेल्सवर झाला परिणाम
रिपोर्टनुसार, इंटेलमध्ये कंपनीत (Intel Corp) जुलै २०२२ मध्ये एकूण १,१३,७०० कर्मचारी काम करत होते. दरम्यान, कोरोना काळात इतरत्र मंदी असतानाही इंटेलला सेल्समध्ये जोरदार उसळी मिळाली होती. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईने बाजारपेठेवर मोठा परिमाण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे संगणक आणि तत्सम उपकरणांची विक्री कमी होत याचा थेट परिणाम इंटेलच्या सेल्सवर झाला आहे.
सध्या चीन संगणकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मात्र चीनमध्ये कोरोनामुळे आता पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे सप्लाय चैन (Supply Chain) मध्येही अडथळा निर्माण झाला आहे. याचा सर्व परिणाम कंपनीच्या सेल्सवर झाला आहे. अशात इंटेलचे CEO पॅट गेलसिंगर यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांना मेमो जारी केल्याचे समजते. दरम्यान, या वृत्तमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची चिंता वाढली आहे.
- Must Read:
- IDBI Bank Privatization : अजून एका बँकेचे होणार खाजगीकरण
- Pune News: थरकाप उडवणारी घटना ! २९ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही
- Health : बाब्बो.. आता ‘या’ आजारामुळे वाढले आरोग्य विभागाचे टेन्शन; वाचा, महत्वाची माहिती..