Job Alert : मुंबई : बेस्ट नेटवर्क, अविश्वसनीय डेटा संपत्ती आणि रोजगार बाजारपेठेबाबत असलेली सखोल माहिती यांच्या आधाराने शाईन डॉटकॉम (Shine.com) या भारतातील दुस-या सर्वात मोठ्या जॉब सर्च (India’s second largest job search platform) व्यासपीठाने अहवाल सादर केला आहे. नव्या ‘टॅलेण्ट इनसाइट्स’ (Talent Insights) अहवालात झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण ट्रेण्ड्स सांगण्यात आले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२१ च्या तुलनेत रोजगार संधी व नवीन रोजगारांची गरज लक्षात घेता आर्थिक वर्ष २०२२ मध्ये नोकऱ्यांचा पाऊस (new jobs) पडणार आहे.
Agniveer Army scheme: अग्निवीर होण्यासाठी मोफत प्रशिक्षण; पहा कुठे आहे शिक्षणाची संधी https://t.co/ySLz58E8cP
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
यंदा ४८ टक्के कंपन्यांनी २०२२-२३ मध्ये कार्यालयातून कामकाज सुरू करण्याचा विचार केला असून ४० टक्के कंपन्या हायब्रिड मॉडेलला प्राधान्य देतात आणि उर्वरित १२ टक्के कंपन्या वर्क-फ्रॉम-होम दृष्टीकोनाबाबत पूर्णपणे समाधानी आहेत. यात नोकरीच्या ट्रेण्डमध्ये लक्षणीय बदल अधोरेखित केला आहे. ८१ टक्के कंपन्यांनी मान्य केले की नॉन- मेट्रो शहरांमध्ये रोजगार वाढले आहेत. आणि खर्च कमी करण्याच्या संधींसह विस्तार करण्याच्या शक्यतांच्या कारणास्तव कार्यालये नॉन-मेट्रो भागात स्थलांतरित झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. अशा नियुक्ती करण्याचा ट्रेण्ड आधुनिक काळातील स्टार्ट-अप्समध्ये लक्षणीयरित्या अधिक दिसून येत आहे. शाईन डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिल गुप्ता (Akhil Gupta, CEO, Shine.com) म्हणतात की, ” एचआर व्यावसायिकांच्या व्यापक नेटवर्कचे आभार मानतो, कारण त्यांनी बहुमूल्य माहिती शेअर केली आहे. यातून आम्हाला पहिले मिंट + शाइन टॅलेण्ट इनसाइट्स (Mint + Shine Talent Insights) लॉन्च करण्यामध्ये मदत झाली. या अहवालामध्ये भौगोलिक क्षेत्रांमधील व विभागांमधील नियुक्ती ट्रेण्ड्सचा समावेश असण्यासोबत टॅलेण्टमध्ये झालेली कपात व पगारवाढ अशा सौम्य पैलूंचा देखील समावेश आहे. काळासह यामध्ये बदल करण्याची आणि व्यापक एचआर समूह व नोकरी-साधकांना अधिक संबंधित माहिती देण्याची इच्छा आहे.”
Agriculture Education: MPKV चा ‘मरडॉक’बरोबर करार; कृषीच्या विद्यार्थ्यांना होणार ‘असा’ फायदा https://t.co/ngHdEzlOWC
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
वेतनवाढ विभाग हा व्यावसायिक आणि नोकरी शोधणा-यांसाठी अहवालाचा सर्वोत्तम भाग आहे. शाईन डॉटकॉम च्या टॅलेण्ट इनसाइट्स’ अहवालानुसार चारपैकी तीन केसेसमध्ये कर्मचारी या आर्थिक वर्षात दोन अंकी वाढीची अपेक्षा करू शकतात, तर एक तृतीयांश केसेसमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ मिळण्याचा अंदाज आहे. अहवालात झपाट्याने बदलत असलेल्या क्षेत्र, राज्य, शहर च विभाग-निहाय नियुक्ती ट्रेण्ड आणि समकालीन रोजगाराच्या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणारे प्रमुख कौशल्य क्षेत्र व प्रोफाइल यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शाईन डॉटकॉमच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत रोजगाराच्या संधींमध्ये क्षेत्रीय योगदान कमी-अधिक प्रमाणात सारखेच राहिले आहे, तरीही या प्रमाणामध्ये दक्षिण क्षेत्राचा (४१ टक्के) सर्वात लक्षणीय भाग आहे. त्यानंतर उत्तर (२६ टक्के), पश्चिम (१९ टक्के) आणि पूर्व (१३ टक्के) या क्षेत्रांचा क्रमांक आहे.
Onion Price : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. ‘येथे’ कांद्याला मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या.. https://t.co/XsjUKYY2wv
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
राज्याच्या योगदानासंदर्भात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (Maharashtra, Karnataka and Tamil Nadu) हे अव्वल तीन दावेदार आहेत, जे या कालावधीत त्यांच्या स्थानावर कायम राहिले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एकूण रोजगार संधींपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त संधी या राज्यांमधून येतात. त्याचप्रमाणे, मेट्रो (४० टक्के) शहरांनी रोजगार बाजारपेठेतील सिंहाचा वाटा कायम ठेवला आहे. पण, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा वाटा देखील वाढला आहे. आयटी क्षेत्राने नोकरीच्या संधींमध्ये अग्रगण्य योगदान देणारे स्थान कायम ठेवले असले तरी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात थोडीशी घसरण झाली आहे. पण ११ टक्क्यांची मोठी घसरण झालेल्या उत्पादन क्षेत्रासोबत याची तुलना करता येऊ शकत नाही.
Adani Vs Ambani: अंबानींना आता अदानी झटका; दोन गुजरातींमध्ये त्यावर पेटणार बिजनेस वॉर https://t.co/fUloTteqWP
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
दुसरीकडे, बँकिंग, फायनान्शियल सर्विसेस अॅण्ड इन्सुशरन्स सेक्टर बीएफएसआयने (Banking, Financial Services and Insurance Sector) लक्षणीय वाढ केली आहे आणि एकूण रोजगार संधींमध्ये ६ टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच, एकूणच रोजगाराच्या संधींमध्ये बांधकाम, रिक्रूटमेंट, शिपिंग आणि शिक्षण (Construction, Recruitment, Shipping and Education) क्षेत्राचे योगदानही वाढत आहे. Shine.com च्या अहवालानुसार निम्मे रिक्रूटर्स बेंगळुरूला भारतातील टॉप-टियर जॉब मार्केट मानतात. पण शहरनिहाय रोजगाराच्या प्राधान्यांबाबत बेंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि मुंबई (Bangalore, Delhi NCR and Mumbai) या शहरांना जवळपास समान प्राधान्य दिले जात आहे. या तीन उच्चस्तरीय शहरांव्यतिरिक्त चेन्नई आणि जयपूर देखील आधुनिक युगातील नियुक्ती करणा-यांच्या दृष्टीने लोकप्रिय होत आहेत.
Agriculture News: अंतरमशागत करा जोमात; वाचा महत्वाचा खरीप कृषीसल्ला https://t.co/hJXUsVAriv
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
सर्व क्षेत्रे, एमएनसी, कॉर्पोरेट्स, स्टार्ट-अप व इतर क्षेत्रांमध्ये डिजिटल मार्केटिंग (३८ टक्के) हे सर्वाधिक मागणी असलेले कौशल्य आहे. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज (आयटी पायथॉन), क्लाउड कम्प्युटिंग आणि डेव्हऑप्स यांचा क्रमांक आहे, तर तिसरे सर्वात लोकप्रिय कौशल्य म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील कौशल्य. दुसरीकडे, सर्वात उल्लेखनीय जॉब प्रोफाइलच्या बाबतीत डेटा सायंटिस्टला (५० टक्के) सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर क्लाउड आर्किटेक्ट (२० टक्के) आणि ब्लॉकचेन इंजीनिअर (१० टक्के) यांचा क्रमांक आहे.
Elon Musk: टेस्लाला झटका..! कार्यालयही केले बंद..! पहा कितीजणांना बसलाय फटका https://t.co/HDFgLwyLTb
— Krushirang (@krushirang) July 14, 2022