Job Alert and Good News : जगभरात जागतिक मंदीमुळे (Global Recession) अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत असतानाच ५जी (5G) आणि टेलिकम्युनिकेशन्ससाठी (Telecommunication) जॉब पोस्टिंगमध्ये (Job Posting) लक्षणीय वाढ झाली आहे. कारण ५जीसारखे तंत्रज्ञान (5G Technology) एका वेगवान गतीने प्रगती करण्याच्या दिशेने झेप घेत आहे, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इंडिड जॉब साइटनुसार (Indeed job site), सप्टेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान टेलिकम्युनिकेशन (Telecommunication) आणि ५जी (5G) साठी जॉब पोस्टिंगमध्ये (Job Posting) ३३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. “भारतात ५जीची आतुरतेने अपेक्षा केली जात आहे, आणि व्यवसायांनी ५जीचे -विशिष्ट तंत्रज्ञान (Technology) आणि सेवा (Service) विकसित करण्यासाठी आधीच काम सुरू केले आहे.
- Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- 5G Technology : मुंबई, पुण्यासह देशातील ‘या’ शहरांत सुरू होणार नेटवर्क; चेक करा शहरांची यादी
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Job Recession: आणखी एका कंपनीकडून होणार नोकरकपात; पहा काय आहे नेमके कारण
- Market closing Bell : महागाई कमी करण्याच्या आश्वासनानंतर बाजारात तेजी
५जीच्या उपक्रमाचा अवलंब अतिशय वेगवान गतीने केला जात आहे. पुढील काही तिमाहींमध्ये या भूमिकांसाठी विशेष नियुक्ती करण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे,” असे इंडिड इंडिया (Indeed India) करिअर एक्सपर्ट (Career expert) सौमित्र चंद (Saumitra chand) यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञानाशी (New Technology) जुळवून घेण्यासाठी यात सुरक्षा प्रणाली डिझाइन करता येऊ शकतील आणि नेटवर्क आर्किटेक्चर (Network) Architecture) अजून मजबूत करता येऊ शकतं तसेच अशा कुशल प्रतिभेची गरज वाढेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
“नोकरी शोधणारे (Job Searcher) आणि उद्योग या दोघांनीही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांनी नव्याने चालना दिलेल्या दूरसंचार क्षेत्राला पूर्ण करण्यासाठी सायबर (Cyber Security) सुरक्षा प्रतिभेचा एक मजबूत पूल तयार केला पाहिजे,” असेही ते पुढे म्हणाले.
मागील एका महिन्यात ग्राहक सेवा प्रतिनिधी (Customer Service Representative) आणि ऑपरेशन्स असोसिएट्सच्या (Operation Associates) क्लिकमध्ये अनुक्रमे १३.९१ टक्के आणि ८.२२ टक्के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तांत्रिक सहाय्य (Technical Support), बीपीओ कार्यकारी (BPO Executive) आणि ग्राहक सेवा प्रतिनिधी (Customer Service Representative) यांसारख्या शीर्ष नोकरीच्या भूमिकेसाठी सरासरी पगार अनुक्रमे ३,५३,२९८ रुपये, ३,२९,५२० रुपये आणि 3,06,680 रुपये होता, असेही या डेटामध्ये स्पष्ट केले आहे. हा सर्व अहवाल इंडिड प्लॅटफॉर्मवर (Indeed platform) सप्टेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या जॉब पोस्टिंग डेटाच्या (Data) विश्लेषणावर आधारित आहे.