Recharge Plan : एअरटेल (Airtel) आणि जिओ (Jio) या देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्या आहेत. त्यामुळेच या दोन्ही कंपन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही कंपन्या अशा अनेक प्लान्स ऑफर करतात ज्यांची किंमत सारखीच आहे परंतु त्यांच्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांमध्ये खूप फरक आहे. आज आम्ही तुम्हाला Airtel आणि Jio च्या रिचार्ज प्लानबद्दल (Recharge Plan) सांगत आहोत ज्यांची वैधता (Validity) 84 दिवसांच्या 800 रुपयांपेक्षा कमी आहे.
Jio 719 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटासह 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. अमर्यादित व्हॉईस कॉल (Unlimited Voice Call) दररोज 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत. इतर फायद्यांबद्दल सांगितले तर जिओ प्लानमध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश मिळतो.
एअरटेल 719 रुपयांचा प्लान
एअरटेल 719 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता ऑफर करते. या प्लानसह अमर्यादित कॉल, दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लानमध्ये 84 दिवसांसाठी Airtel Xstream Mobile Pack सुविधा मिळते. याशिवाय या प्लानमध्ये FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक (Cashback) देखील मिळतो. Apollo 24|7 सर्कलमध्ये तीन महिन्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता विनामूल्य प्रवेश मिळतो.
आता जर आपण या दोन प्लान्सची तुलना केली तर या प्लानमधील सर्वात मोठा फरक म्हणजे डेटा. Jio त्याच किमतीत दररोज 2GB डेटा देत आहे, तर Airtel 1.5GB डेटा प्रतिदिन देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा डेटा वापर जास्त असेल, तर जिओ प्लान तुमच्यासाठी चांगला असेल.