Jio Recharge Plan : जिओचा शानदार प्लॅन! अवघ्या 4 रुपयात मिळणार अमर्यादित कॉलसह डेटा

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अवघ्या 4 रुपयात अमर्यादित कॉलसह डेटा मिळवू शकता. विशेष म्हणजे यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश दिला जात आहे.

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

किमतीचा विचार केला तर रिलायन्स जिओच्या या गुप्त प्लॅनची ​​किंमत 1,559 रुपये इतकी आहे. जर या प्लॅनची ​​किंमत रोजच्या आधारावर मोजायची झाली तर ती दररोज 4 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची वैधता देण्यात येत आहे.

याचा अर्थ ते अंदाजे 1 वर्षासाठी वैध असून जर आपण डेटाबद्दल बोलायचे झाले तर वापरकर्त्यांना एकूण 24 GB डेटा मिळतो. संपूर्ण डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps वर राहतो. कंपनीचा हा प्लॅन खासकरून अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमी खर्चात एक वर्षासाठी सिम सक्रिय ठेवायचे आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये प्रत्येक नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच 3600 एसएमएस दिले आहेत. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या प्लॅनद्वारे रिचार्ज करायचा असल्यास हा रिचार्ज फक्त जिओ ॲप किंवा वेबसाइटवरूनच करता येणार आहे. नाहीतर तुम्ही या प्लॅनसह इतर कोठूनही रिचार्ज करू शकत नाही, म्हणूनच या योजनेला गुप्त रिचार्ज प्लॅन म्हटले आहे.

एअरटेलचा 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तर एअरटेलचा 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्ण ३६५ दिवसांची वैधता मिळत असून या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, एकूण 3600 एसएमएस आणि 24GB डेटाचा समावेश केला आहे.

Leave a Comment