Jio recharge plan : अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंगसह येतो जिओचा ‘हा’ प्लॅन, किंमतही आहे खूपच कमी

Jio recharge plan : रिलायन्स जिओचे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत शानदार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक खास प्लॅन आणला आहे. ज्यात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंगका लाभ घेता येईल.

Reliance Jio कडून 300 रुपये किंमतीचा प्लॅन ऑफर केला जात असून त्याची वैधता एक महिन्याची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि रोजच्या एसएमएस सारख्या सुविधा मिळतात. अशा प्रकारे, समजा तुम्हाला एका महिन्यासाठी रिचार्ज करायचा असल्यास तुम्हाला कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नको असेल, तर हा प्लॅन निवडणे योग्य ठरू शकते.

रिलायन्स जिओचा नो डेटा लिमिट प्लॅन

किमतीचा विचार केला तर जर तुम्हाला नो-डेटा लिमिट प्लान निवडायचा असल्यास तुम्ही जिओचे सदस्य असाल तर तुम्हाला त्यासाठी २९६ रुपये द्यावे लागतील. हा रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि रिचार्ज केला तर ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. इतकेच नाही तर दररोज १०० एसएमएस पाठवता येतील.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये रोजच्या डेटाऐवजी एकूण 25GB डेटा मिळतो. हा डेटा पूर्ण ३० दिवसांसाठी उपलब्ध असून तुम्ही इच्छित असल्यास, आपण सर्व डेटा एकत्र वापरू शकता किंवा सेव्ह करू शकता. या प्लॅनमध्ये रिचार्ज करताना दैनंदिन डेटा संपण्याचे कसलेही टेन्शन राहणार नाही.

मिळेल अमर्यादित 5G डेटा

Reliance Jio चे सदस्य ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे आणि ज्यांच्या क्षेत्रात 5G रोलओव्हर झाला आहे, त्यांनी 239 रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनसह रिचार्ज केला तर कोणत्याही अतिरिक्त पेमेंटशिवाय अमर्यादित 5G डेटाचा लाभ देण्यात येत आहे. 296 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतरही, पात्र वापरकर्त्यांसाठी कोणतीही डेटा मर्यादा लागू नाही आणि अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे.

Leave a Comment