Jio recharge plan : जिओचा धमाका! ‘इतक्या’ स्वस्तात मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा प्लॅन

Jio recharge plan : जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही आता खूप स्वस्तात अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये आहे. शिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटासह अनेक फायदे मिळतात.

जिओच्या 296 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

रिलायन्स जिओचा 296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येत असून कंपनीच्या या प्लॅनमध्ये, ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि एक वेळचा 25GB (4G) डेटा मिळतो. विशेष म्हणजे कंपनी या प्लॅनसह स्वागत ऑफर देखील देते, जी खरोखरच अमर्यादित 5G डेटा ऑफर आहे. प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे म्हणून JioCinema, JioTV आणि JioCloud चा प्रवेश मिळेल.

समजा Jio चे 5G कव्हरेज तुमच्या क्षेत्रात उपलब्ध असेल आणि तुम्ही 5G चालवत असाल, तर तुम्ही अमर्यादित 5G ऑफरचा लाभ घेता येईल. जर तुम्ही Jio च्या 5G कव्हरेजमध्ये नसाल आणि 4G डेटा संपला तर तुमच्यासाठी स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो. हे लक्षात ठेवा की या प्लॅनची ​​सेवा वैधता ३० दिवसांची आहे. तसेच या कंपनीकडे 15 रुपयांपासून सुरू होणारे डेटा व्हाउचर आहेत, ज्याद्वारे तुम्ही FUP डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असेल तर 1GB डेटा मिळेल.

किमतीचा विचार केला तर 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला दररोज सुमारे 10 रुपये मोजावे लागतील. एका महिन्याच्या अमर्यादित 5G डेटा वापरासाठी ही काही चांगली गोष्ट आहे. तुम्ही रोजचा डेटा प्लॅन घेतला तर तुम्हाला आणखी कमी किमतीत प्लॅन मिळेल. पण तुम्हाला 296 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे एका दिवसात 10GB किंवा 15GB खर्च करण्याची सुविधा मिळणार नाही.

Leave a Comment